नगर संवाद : नगर तालुक्यातील भातोडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची निवडणूक अखेर पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या व महाविकास आघाडीच्या सौ. सुनीता विक्रम गायकवाड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी माजी खासदार सुजय विखे गटाच्या व भाजपच्या ज्योती विक्रम लबडे या सरपंच होत्या. त्यांच्यावर अविश्वास आणून सात सदस्यांनी त्यांना पाय उत्तर केले. त्यानंतर सरपंच पदाची निवडणूक 6 मार्च रोजी भातोडी ग्रामपंचायत येथे पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या सुनीता गायकवाड यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. एकच अर्ज दाखल असल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली दळवी यांनी काम पाहिले. उपसरपंच राजू पटेल, आजिनाथ शिंदे, ठाकरे गटाचे शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, शिवसेना शाखाप्रमुख भाऊसाहेब धलपे यांनी ठाकरे गटाकडून असणाऱ्या उमेदवाराचे नेतृत्व केले. उपसरपंच राजू पटेल, सदस्य सुभाष कचरे, कैलास गांगर्डे, सुनीता विक्रम गायकवाड, सुनिता जालिंदर लबडे, उलफत यूनुस पटेल, मुमताज शकीर मुलाणी असे सात सदस्य गायकवाड यांच्या बाजूने असल्याने विरोधी बाजूने एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होणार ही औपचारिकता बाकी होती. अपेक्षेप्रमाणे सुनीता गायकवाड यांचा एकच फॉर्म सरपंच पदासाठी आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली दळवी यांनी सुनीता गायकवाड यांची सरपंच पदी निवड झाल्या जाहीर केले. गायकवाड यांचे खासदार निलेश लंके व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, संदेश कारले, सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड यांनी अभिनंदन केले. गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष रियाज शेख, अशोक कदम, कोंडीराम लबडे, जालिंदर लबडे, ज्ञानेश्वर घोलप, पापामिया पटेल,अमोल कदम, विलास लबडे, शाम लबडे, पांडू पटेल, किरण खराडे आदींनी सहकार्य केले.
Tags
अहिल्या नगर