नगर संवाद :- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईछत्तीशी या विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत इयत्ता दहावीचा निकाल ९६.०५ टक्के व इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल ७१.३० टक्के लागला असून विद्यालयाच्या गुणवत्ता पूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता दहावी मध्ये कुमारी भक्ती योगेश वाघ हिने ९३ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक शौर्य संजय शेळके ९२.६० टक्के व मेटे कार्तिक शरद ९२.४० टक्के मिळून पटकवला आहे.
इयत्ता दहावी मध्ये विशेष श्रेणी मध्ये ४२ तर प्रथम श्रेणीमध्ये ५७ विद्यार्थी आहेत.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक शिंदे प्रियंका बिभीषण हिला ७७.६७ टक्के द्वितीय क्रमांक वाडेकर भाग्यश्री विजय ७१.३३ टक्के तृतीय क्रमांक सय्यद साहिल सिकंदर ७० टक्के प्राप्त केले आहेत.
विद्यालयाच्या या यशाबद्दल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रा.ह.दरे साहेब, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर , सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील. सहसचिव जयंतराव वाघ साहेब, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, ज्येष्ठ विश्वस्त मुकेश मुळे साहेब, प्राचार्य शिवाजी धामणे सर, पर्यवेक्षक दत्ता नारळे तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Tags
अहिल्या नगर