नगर संवाद
भारत, पाकिस्तान युद्ध तणावाच्या या गंभीर परिस्थितीमुळे पंजाब आणि राजस्थानसह भारतातील अनेक राज्यांमध्ये महत्त्वाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय जवानांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या काळात अनेक भारतीय जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. अशाच एका जवानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून त्याची देशभक्ती दिसत आहे. रजा रद्द झाल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाताना सैनिक म्हणाला की, मी परत येईन याची कोणतीही हमी नाही. पण भारताला काहीही होणार नाही याची पूर्ण हमी आहे. माझ्या शूर सैनिकांनो, संपूर्ण देशाला पूर्ण विश्वास आहे की ते पाकिस्तानला हरवून परत येतील. पुढचं आइस्क्रीम लाहौरमध्ये खाऊ, असं तो म्हणाला आहे. त्याच्या या देशप्रेमाचे सर्व कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताने जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले उधळून लावले. यानंतर, भारतानेही प्रत्युत्तर दिले आणि लाहोर आणि कराचीसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटे बोलण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला आहे आणि आज त्यांनी भारतावर अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर देत त्यांचे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत
Tags
अहिल्या नगर