लग्नापेक्षा देशसेवा महत्वाची..लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवान सीमेवर.

लग्नापेक्षा देशसेवा महत्वाची..लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवान सीमेवर.

नगर संवाद 
वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची झलक दाखवून दिली आहे. नुकतंच त्याने लग्न झाले आहे. पण लग्नाच्या केवळ दोनच दिवसांनंतर सैन्यदलाकडून त्याला बोलवण्यात आले. त्यानेही क्षणाचा विलंब न करता देशसेवेसाठी तात्काळ सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. त्याने भावनांच्या काठावर उभं राहून तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

आज दुपारी २.३० वाजता कृष्णा अंभोरे हा उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. यामुळे गावातील वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी "जय जवान", "वंदे मातरम्" अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. "देश आधी, बाकी नंतर" हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

कृष्णाच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पतीच्या सहवासाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याआधीच विरहाचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण कृष्णाने या भावनांचा विचार न करता तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.


Post a Comment

Previous Post Next Post