नगर संवाद
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणारः
SC चे 4 महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश;
2022 पूर्वीच्या स्थितीनुसार होणार इलेक्शन
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या महानगर पालिका,नगर पालिका,जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला दिले आहेत. कोर्टाने या निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यांच्या आत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगर पालिका,नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता आहे.
वकील सिद्धार्थ शिंदे यांनी यासंबंधी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार ह्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोग व राज्य सरकारला येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल.
Tags
अहिल्या नगर