जमीन परस्पर लाटली, शेतकरी कुटुंबाचे उपोषण

जमीन परस्पर लाटली, शेतकरी कुटुंबाचे उपोषण

नगर संवाद : मोजे चिचोंडी पाटील येथील गट नंबर 1026 मधील 51 गुंठे जमीन सुधीर राजाराम भद्रे याने इतरांनी तत्कालीन तलाठी सर्कल यांना हाताशी धरून कुठलेही खरेदीखत घेता बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावून घेतले,
दिनांक 13/01/2025 रोजी तहसील कार्यालय येथे सरोदे परिवार व सरपंच शरद पवार परिवार यांनी अमरण उपोषण करून मागील 5 महिन्यापासून तारीख पे तारीख असा खेळ लावून कुठलीही कार्यवाही झाली नाही

 चिचोंडी पाटील येथे गट नंबर 1026 मधील सरोदे यांच्या नावावरील 51 गुंठे जमीन कुठलेही खरेदी न देता सुधीर राजाराम भद्रे व अन्य एकाने बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावून घेतले,याबाबत दिनांक 13/01/2025.रोजी तहसील कार्यालय येथे  सरोदे कुटुंबीयांनी उपोषणाला बसले होते तेव्हा नायब तहसीलदारांनी सायंकाळी 5 वाजता यांना लेखी पत्र देऊन त्वरित कार्यवाही करून त्वरित गट नंबर 1026 मधील 51 गुंठे क्षेत्र सरोदे कुटुंबीयांच्या नावासमोर लावून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. त्यानंतर सरोदे कुटुंबीयांना व सुधीर भद्रे,अशोक बन्सी कोकाटे यांना नोटीसा येऊन,सर्व पुरावे देऊनही आत्तापर्यंत अनेक वेळा तहसीलदार यांच्यासमोर अनेक तारखा/सुनावण्या होऊन प्रत्येक वेळेस पुढील तारीख देण्यात येत आहे,सदर सुधीर राजाराम भद्रे, व कोकाटे यांच्याकडे 51, गुंठ्याचे कुठलेही पुरावे व खरेदीखत साठेखत नसूनही सरोदे कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी टाळाटाळ होत असल्याची दिसून येत आहे, त्यामुळे येत्या आज  सरोदे कुटुंबीय नगर उपविभागीय कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेली आहेत व न्याय मिळेपर्यंत ते उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post