राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी, पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या निकालाबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबद्दलची माहिती दिली आहे. उद्या 5 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. यंदा ही परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधी घेण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल, विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. तर 6 मे मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
खालील वेबसाइट्सवर निकाल पाहता येतील
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
Tags
अहिल्या नगर