अखेर निंबळक रेल्वे उड्डाणपुल सर्व्हेला सुरुवात

अखेर निंबळक रेल्वे उड्डाणपुल सर्व्हेला सुरुवात

नगर संवाद 
 सन 2017 पासून येथील रेल्वेगेट वर उड्डाणपुल करण्यात यावा यासाठी पं.स.चे मा.उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी विशेष पाठपुरावा केला.सोबत बी.डी.कोतकर ,दत्तात्रय दिवटे,दत्तूअण्णा कोतकर,शिवाजी दिवटे,दत्ता कोतकर , दत्ता गुलाब कोतकर,संदिप कोतकर,विकास घोलप,निलेश पाडळे,इतर ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांनी वेळोवेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता त्यास प्रतिसाद देत जानेवारी 2025 ला रेल्वे मंत्रालयाने पत्र पाठवत ह्या कामासाठी 100% निधीची तरतूद करत लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्याचे कळविले होते . राज्य शासनाने ह्यातील निम्मी रक्कम खर्च करण्याचा अडसर त्यामुळे दूर झाला .
 आज अंतिम सर्वेसाठी सुरुवात करण्यात आली .त्यामधे मोजमाप घेऊन खुणा करण्यात आल्या.सर्वेसाठी ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते.ह्यानंतर ड्रोन सर्वे करण्यात येऊन अंतिम रेखांकन करण्यात येईल व प्रत्यक्ष डिज़ाइन करण्यात येईल. 
रेल्वे मंत्रालयाच्या पत्रानंतर सुद्धा हे काम सुरु होईल की नाही ह्याबद्दल ग्रामस्थामधे साशंकता होती . 
आज अंतिम सर्वेसाठी सुरुवात झाल्याने फक्त निंबळकच नव्हे तर एम. आय.डी.सी. मधील हजारो कामगार लोकांच्या महत्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे.ह्या रस्त्यावर नगर शहर ,नगर तालुका,पारनेर तालुक्यातील अनेक गावातील लोक प्रवास करत असतात तसेच सूपा एम.आय.डी.सी.मधून इकडे येणारे अनेक लोक असतात .गेट बंद असल्यावर रूग्ण अडचणीत सापडतात ,वाहतूक कोंडी,अशा अनेक समस्या येतात.लवकरच ह्या समस्येतुन सुटका होऊन वर्षअखेर पर्यंत कामास सुरुवात होईल.
   ( सर्वांच्या सहकार्याने जनतेचे स्वप्न साकार होत असताना मनस्वी आनंद होत आहे. आता उद्योग व्यवसाय व आर्थिक उलाढ़ाल वाढेल.
 डॉ.दिलीप पवार मा.उपसभापती )

Post a Comment

Previous Post Next Post