२२वर्षांपासून यशवंत विद्यालय हिवरे बाजारची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

२२वर्षांपासून यशवंत विद्यालय हिवरे बाजारची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

नगर संवाद:- यशवंत माध्यमिक विद्यालय आदर्शगाव हिवरे बाजारच्या इयत्ता दहावीच्या मार्च २०२५  च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून याहीवर्षी यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कु.श्रुती संभाजी ठाणगे ९५.०० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली, चि.ढगे अनोश कांचन  ९३.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय तर कु. श्रुतिका कुशाबा ठाणगे ही ९०.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला आहे. एकूण ३० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १९  विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त आहेत व ०८ विद्यार्थी प्रथम श्रेणी व ०३  विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यासाठी त्यांना मुख्याध्यापक मुरलीधर अमृते तसेच शिक्षक दिपक ठाणगेकैलास खैरेनंदकुमार झावरे व नीता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पदमश्री डॉ.पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्यसौ.विमलताई ठाणगे सरपंच आदर्शगाव हिवरेबाजार छ्बुराव ठाणगे चेअरमनरामभाऊ चत्तर व्हा. चेअरमनहरिभाऊ ठाणगे सरएस.टी.पादीर (अध्यक्ष) शाळा व्यवस्थापन समितीबाबासाहेब गुंजाळ चेअरमन दूध डेअरीरोहिदास पादिरसहदेव पवार गुरुजी,दत्तात्रय ठाणगे सर व सर्व पालक व  ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post