नगर संवाद
केडगाव देवी अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाचा दहावीचा निकाल 99.45% इतका लागला. विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. विद्यालयाचे एकूण 17 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 51 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. विद्यालयात प्रथम क्रमांक कु. वायबसे मयुरी सचिन(97.20%), द्वितीय क्रमांक पानसरे ऋग्वेद रवींद्र(94.40%), तृतीय क्रमांक खोडाळ अमन गोरख(93.60%), घुगे देवदत्त राजेंद्र (93.60%) या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मश्री पोपटराव पवार साहेब, माजी सचिव शिवाजीराव भोर, स्कूल कमिटी सदस्य किसन सातपुते, महेश गुंड, सल्लागार समिती सदस्य उद्योजक रावसाहेब सातपुते, अंबादास गारुडकर, प्रशांत कोतकर, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा विभागीय अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे, उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, पंचक्रोशीतील मान्यवर तसेच सल्लागार मंडळ, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.या सर्व विद्यार्थ्यांना सिताराम जपकर, रोहिणी चोभे, विलास भोंदे,प्रदीप गारुडकर, महेश ढगे, कुशाभाऊ अकोलकर, राजेंद्र जाधव, रवीकुमार तंटक, किसन रोहोकले, जयश्री बामदळे,अरुणा दरेकर,स्वाती चोभे, उर्मिला खिलारी, सरस्वती दुधाडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
अहिल्या नगर