कुंभमेळ्यातील पवित्र त्रिवेणी संगमातील जल चिचोंडी पाटीलच्या केळ तलावात अर्पण

कुंभमेळ्यातील पवित्र त्रिवेणी संगमातील जल चिचोंडी पाटीलच्या केळ तलावात अर्पण

चिचोंडी पाटील ता.नगर येथील सरपंच,उपसरपंच,सदस्य,पदाधिकारी, शिवभक्त,रामभक्त, यांनी उत्तर प्रदेशातील 144 वर्षांनी होणाऱ्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करून ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांसाठी गंगा,यमुना,सरस्वतीचे पवित्र त्रिवेणी संगमाचे जल आणले. महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र शाही स्नान करण्याचा अविस्मरणीय आणि अध्यात्मिक अनुभव सर्वांनी घेतला._* 
              *_गंगा,यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात स्नान करताना मनात शांती,भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा सर्वांनी अनुभवली._* 
 या प्रयागराज महा कुंभमेळ्यासाठी,,_ 
 *_सरपंच शरदभाऊ पवार व उपसरपंच विश्वसागर कोकाटे ,ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे,भाऊसाहेब ठोंबरे,सेवा सोसायटी संचालक डॉ मारुती ससे,अण्णासाहेब परकाळे, पैलवान राजाभाऊ कोकाटे,उद्योजक अभयशेठ छाजेड,चंदूकाका पवार, रवीशेठ पवार,कामधेनू संस्थेचे व्हॉइस चेअरमन प्रमोद पवणे, रोहिदास पाटील कर्डिले,नांदूरचे सरपंच विलास गवळी,संदीपजी तापकीर,दत्तू फिटर कोकाटे,कल्याण कोकाटे सावकार, मेजर हनुमान कोकाटे,संजय दानवे, प्रशांत कोकाटे,श्रीकांतशेठ कराळे, अनिल हजारे टेलर,नाना रावसाहेब कोकाटे, आदित्य कोकाटे,रॉबिन सिंग, भरत सोनटक्के यांनी चिचोंडी पाटील ग्रामस्थांसाठी पवित्र गंगा,यमुना,आणि सरस्वतीचे जल ग्रामस्थांसाठी आणले._* 
 *_या महा कुंभमेळा प्रयागराज दर्शन यात्रेत उत्तर प्रदेशातील प्रयागराज कुंभमेळा त्रिवेणी संगम,देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी  वाराणशी काशी_* *_विश्वनाथ शिवलिंग,आयोध्या राम जन्मभूमी राम मंदिर, मध्य प्रदेशातील उज्जैन महाकाल शिवलिंग,ओमकारेश्वर शिवलिंग येथे  देशातील महत्त्वाच्या देवस्थानांचे दर्शन सर्वांचे झाले._* 
 *_सर्व सहकारी मित्र परिवार, राजकीय,सामाजिक शैक्षणिक,कृषी व सर्व उद्योजक क्षेत्रातील चिचोंडी पाटील गावातील नगर शहरातील सहकारी या दर्शन यात्रेत सहभागी झाल्याबद्दल सरपंच शरदभाऊ पवार यांनी सर्वांचे 🙏आभार मानून सर्वांना पुढील अशा तीर्थदर्शन यात्रेसाठी 💐शुभेच्छा, देऊन आभार मानले._*
             *_यावेळी महा कुंभमेळा प्रयागराज,श्रीराम जन्मभूमी अयोध्या, देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी महाकाल उज्जैन,ओमकारेश्वर,नर्मदा येथे तीर्थदर्शन यात्रा करून तेथील पवित्र जल ग्रामस्थांसाठी_* *_आणल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ व मा.सभापती प्रवीणजी कोकाटे यांच्याकडून सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य शिवभक्त रामभक्त यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे सन्मान करण्यात आला._* 
 *_व पवित्र जल सर्वांच्या उपस्थितीमध्ये मेहेकरी व केळनदी वरती असणाऱ्या चिचोंडी पाटील दौलावडगाव भातोडी या त्रिवेणी शिवाच्या चिचोंडी पाटील_* *_ग्रामपंचायतला पाणी पुरवणाऱ्या (केळ तलावात) त्रिवेणी संगमाचे पवित्र जल अर्पण करण्यात आले,_* 
 *_त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाला गंगा यमुना सरस्वतीचे पवित्र जल पूजेसाठी स्नानासाठी मिळणार असल्याचे सभापती व सरपंच ग्रामस्थांनी सांगितले._*

Post a Comment

Previous Post Next Post