माथनीत श्रीसंत गव्हाणेबाबांच्या ३० व्या नारळी साप्ताहाचे आयोजन
अहिल्यानगर : माथनी ( ता. नगर ) येथे श्रीसंत गव्हाणेबाबा यांच्या ३० व्या नारळी नाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ४ ते मंगळवार दि. ११ मार्च दरम्यान होणाऱ्या या नमसप्ताहत काकडा, गाथापारायण, गाथा भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे संयोजन ह.भ.प. महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे तर विनापूजनसेवा ह. भ. प.छगन महाराज मालुसरे हे करणार आहेत.
सप्ताहकाळात ह.भ.प.मंगेश महाराज मोरे (तुकाराम महाराज यांचे वंशज ), ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी, (एकनाथ महाराजांचे वंशज ), ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी ), ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे ( आळंदी ), ह.भ.प. सत्यजित महाराज लाटे (बीड ), ह.भ.प. विकास महाराज मिसाळ (पिंपळगाव ), ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर (जाटदेवळा ) यांची कीर्तनसेवा तर मंगळवार दि. ११ रोजी
ह.भ.प. महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याअगोदर २०१० साली माथनी येथे या नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता तब्ब्ल पंधरा वर्षांनी हाच नारळी सप्ताह माथनी येथे पुन्हा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. साप्ताह दरम्यान भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था वाघ, जगताप, घोरपडे, नवले, कापसे, परदेशी, कांडेकर, फुलमाळी आदी परिवाररांकडून करण्यात आली आहे.
Tags
अहिल्या नगर