नगर संवाद
वाढदिवस म्हटला की,नवीन कपडे,महागडा केक,फटाक्यांची आतषबाजी,हॉटेल मधली मेजवानी,या सर्व बाबी वर मोठा खर्च होतो ते टाळून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्या संकल्पनेतून समर्थ श्रीराम कातोरे याचा वाढदिवस चक्क वनविभागात वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बणवलेल्या पाणवट्यात पाणी सोडून केला
कामरगाव ता.(अहिल्यानगर ) येथे कहाळेच्या च्या डोंगर माथ्यावर व पायथ्या लगत जागोजागी पाणवठे तयार केलेले आहेत तेथे वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी लोकसहभागातून पाणी सोडण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे
आज समर्थ कातोरे याच्या 12 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंगरावरील सर्व पाणवट्यात स्वखर्चाने पाणी सोडले त्या ठिकाणी त्याला उपस्थित असणारे वन्यप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे,वन्यप्राणी संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे मेजर, संकेत गवळी,सुरज,खोडदे रमजान शेख,श्रीराम कातोरे,वैभव लाळगे, रज्जाक सय्यद, विकास कातोरे,व,पार्थ भालसिंग,यांनी समर्थ यास निरामय आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या
वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च वाचवून कातोरे परिवाराने राबवलेला उपक्रम इतरांसाठी स्तुत्य व प्रेरणादायी आहे वन विभागात शासन स्तरावरून वन्य प्राण्यांसाठी चारा व पाण्याची सोय होत नाही त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत धुडगुस घालतात त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर लोकसभागातून कामरगाव येथे चाललेला उपक्रम योग्य आहे या उपक्रमाचे गावासह पंचक्रोशीतील वन्यप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे
Tags
अहिल्या नगर