चिचोंडी पाटील येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन समाजकारण करण्याचे आवाहन मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले.
चिचोंडी पाटील शिवसेना शाखेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,मा.उपसभापती दत्तात्रय हजारे,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,मा.चेअरमन डॉ.मारुती ससे,मा.व्हाईस चेअरमन काशिनाथ बेल्हेकर,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,मा.उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे,भाऊसाहेब वाडेकर,शाखाप्रमुख दत्ता जाधव,महादेव खडके,शिवसेना नेते अजय कांकरिया,भगवान पवार,बाबासाहेब शेंडकर,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे,सोसायटी संचालक बबन कोकाटे,आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
अहिल्या नगर