परजातीय मुलाबरोबर प्रेम, बहिणीची चुलत भावाकडून हत्या

परजातीय मुलाबरोबर प्रेम, बहिणीची चुलत भावाकडून हत्या

दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे चुलत भावाने बहिणीची डोंगरावरून खाली ढकलून देत हत्या केली होती. ऑनर किलिंगची ही घटना संभाजीनगरच्या तिसगावजवळ खवड्या डोंगर परिसरात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. नम्रता गणेशराव शेरकर (17, रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना) असे मृत तरुणीचे नाव आहे. ऋषिकेश तानाजीराव शेरकर (25, रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी भावाचे नाव आहे.

दरम्यान या घटनेसंदर्भातील व्हिडिओ आता समोर आला आहे. बहिणीला डोंगरावरून ढकलून दिल्यानंतर खाली उतरत असताना आरोपी भाऊ कॅमेऱ्यात कैद झाला. डोंगराच्या पायथ्याशी क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्याचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात हा आरोपी दिसून आला.

मृत तरुणी नम्रता शेरकर बारावीमध्ये शिकत होती. तिचे शहागड गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तो दुसऱ्या जातीचा होता. तोही कॉलजेमध्ये शिक्षण घेत होता. नम्रता काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेली होती. वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे तिच्या सख्ख्या काकांकडे पाठवले होते.

Post a Comment

Previous Post Next Post