नगर तालुक्यातील या गावांत महिलाराज

नगर तालुक्यातील या गावांत महिलाराज

नगर संवाद 
नगर तालुक्यातील 52 गावांमध्ये महिलाराज 
नगर तालुक्यातील 105 गावांपैकी 52 गावांमध्ये महिलाराज येणार आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी तालुक्यातील 98 गावांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली .त्यातील 47 आणि पूर्वीचे आरक्षण कायम केलेले 5 अशा 52 गावांमध्ये महिला सरपंच असणार आहेत.
आज दुपारी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील राजश्री शाहू महाराज सभागृह मध्ये आज महिला आरक्षण सोडत पार पडली. उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली.यावेळी तहसीलदार संजय शिंदे,नायब तहसीलदार अभिजित वांढेकर आधी उपस्थित होते. महिला आरक्षण साठी झालेल्या सोडतीमध्ये खालील गावांमध्ये महिलाराज अवतरणार आहे.


अनुसूचित जाती राखीव- 
सांडवे, कामरगाव, मांडवे, अकोळनेर /जाधववाडी , पांगरमल, भोरवाडी

 अनुसूचित जमाती - जेऊर 

नागरिकांचा मागास प्रवर्ग 
- शिराढोण, ससेवाडी, निंबळक ,हमीदपूर ,वाळुंज, खडकी ,शहापूर/ केकती, मठ पिंपरी, कर्जुनेखारे ,इमामपूर, अरणगाव ,पारगाव मौला, उदरमल ,नांदगाव / कोळपे आखाडा,

 सर्वसाधारण
 शिंगवे, इस्लामपूर, विळद ,पोखर्डी , बुऱ्हाणनगर , जखणगाव, सोनेवाडी (चास), चास, दशमीगव्हाण, सोनेवाडी ( पिला), खांडके , माथनी/ बाळेवाडी, वाळकी, नवनागापूर, घोसपुरी, टाकळी काझी, मदडगाव, हिवरे झरे ,साकत खुर्द, वडगाव तांदळी, वाटेफळ ,तांदळी वडगाव ,अंबिलवाडी, खोसपुरी ,नागरदेवळे, हातवळण ,देवगाव

कायम ठेवण्यात आलेले आरक्षण 
भोयरे खुर्द ,पारेवाडी/पारगाव (अनुसूचित जाती स्री) बुरुडगाव (अनुसूचित जमाती स्री )
  भोयरे पठार व मजले चिंचोली (सर्वसाधारण स्री)

Post a Comment

Previous Post Next Post