नगर संवाद
निंबळक ,इसळक, खारे कर्जुने ही गावे नेप्ती महसूल मंडलला जोड़णे विषयीचे निवेदन नुकतेच नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार मा.काशिनाथ दाते सर यांना देण्यात आले.
सदर गावे सध्या नागापुर महसूल मंडलात समाविष्ट आहेत.ह्या भागातील पर्जन्यमापक नागापुर सीना परिसरात आहे त्यामुळे तेथे पर्जन्यमान जास्त दर्शविले जाते परंतु वास्तवात मात्र ही गावे कमी पावसाची आहेत , ह्याचा फटका शेतकरी वर्गाला विविध शासकीय योजना घेताना बसतो. चूकीची आणेवारी आल्याने शेतकरी वंचित राहतो. तसेच ह्या मंडलात येणारी इतर गावे उदा.विळद,देहरे,नांदगाव शिंगवे,शिंगवे नाईक बाग़ायत क्षेत्राची आहेत ते ह्या शहरी मंडलात येतात .निंबळक ,इसळक,खारे कर्जुने , ही गावे जिरायत क्षेत्राची असून खारे कर्जुने ह्या गावाचे भारत सरकारचे संरक्षण खात्याकड़े मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून सदर क्षेत्र हे पड़ व नापिक आहे. ह्या तिनही गावातील शेतकरी वर्गाला पीक विमा ,खराब हवामान , इतर नैसर्गिक आपत्ति मधे मिळणाऱ्या सुविधा , शेती कर्जाचे पुनर्गठन , कृषि विभागाच्या सुविधा आदि पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष अन्याय होत आहे. ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नव्याने झालेल्या नेप्ती मंडलात समावेश करावा,
तसेच ह्या परिसरात नविन पर्जन्यमापक बसवावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अंबादास शेळके पा.,विलास कांडेकर, शरद बेकारसे राहुल दरंदले,राम शेळके , तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते .
चौकट
मागील वर्षापासून ह्या संदर्भात पाठपुरावा करत आहे परंतु शासन दरबारी अनास्था आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सालिमठ यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही .
मा.उप सभापती डॉ.दिलीप पवार
चौकट
शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नात मा.जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महसूल मंडल बदल करण्यात यशस्वी प्रयत्न करू .
आमदार काशिनाथ दाते
Tags
अहिल्या नगर