आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा 34 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा 34 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नगर संवाद 
अहिल्यानगर सोबतच राज्यातील लाखो श्रोत्यांचे ज्ञान; माहिती आणि मनोरंजन करणाऱ्या आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा ३४ वा वर्धापन दिन 14एप्रिल रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.,' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हे ब्रीद घेऊन गेली ३४ वर्ष अहिल्यानगर आकाशवाणी केंद्र श्रोत्यांची अविरत सेवा करतं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि नटराज पूजनाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांनी केले. यावेळी त्यांनी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वाटचालीचा आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्मितीचा आलेख मांडला. केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमात संगीत अलंकार गायिका संपदा चौधरी; वैष्णवी मोरे ; प्रमिला वाघ ; संगीता पवार आदींनी शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर केले.भरतनाट्यम विशारद करिश्मा कोठारी यांनी गणेश वंदना प्रस्तुत केली. चेतन औटे; संजय वैरागर ; आदिनाथ अन्नदाते आदींनी हास्य कला; विद्या जोशी यांनी एकपात्री अभिनय तर दिप्ती शुक्रे ; विकास कावरे; अक्षता अन्नदाते; शालिनी वाघ;निकिता रसाळ ;श्रेयस लहामगे; अतुल सातपुते आदींनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.  यावेळी आकाशवाणीचे अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार; महेंद्र रोहोकले; देविदास अवलेलु; संतोष साबळे;रावसाहेब देशमाने , तसेच प्रसारण सहाय्यक, नैमित्तिक उद्घोषक ,आकाशवाणी कर्मचारी आणि श्रोते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शेटे यांनी केले.तर जयंत लाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post