नगर संवाद
चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे.
या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलायाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
Tags
अहिल्या नगर