नगर तालुका महााविकास आघाडीत बिघाडी

नगर तालुका महााविकास आघाडीत बिघाडी


नगर संवाद 
आमदार कर्डिले यांना विरोध म्हणून १९ वर्षापूर्वी नगर तालुक्यातील महाविकास आघाडी स्थापन झाली.तब्बल १२ वर्ष नगर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये मविआ चा बोलबाबा राहिला.परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकांमधे नगर तालुका माविआ नेत्यांमध्ये मध्ये अतंर्गत सुसंवाद दिसून आला नाही.त्याचे पडसाद आता दिसू लागले असून शिवसेनेचा एक गट बंडखोरीच्या तयारीत आहे. त्यामूळे नगर तालुक्यातील मविआची घडी  विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

२००६-२००७  च्या सुमारास तत्कालीन राष्ट्रवादी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना विरोध म्हणून काँग्रसचे माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी एकत्रित येत नगर तालुक्यात महाविकास आघाडीची मोट बांधली.त्यास अहमदनगर शहरातील तत्कालीन आमदार अनिल भैय्या राठोड यांनी साथ मिळाली.त्यामुळे २००७ च्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नगर तालुका मविआ ने मोठे यश संपादन केले.  तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या ताब्यातून पंचायत समितीची सत्ता हिसकावून घेत नगर पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकला.

पुढील काळात  वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि २००९ आमदार शिवाजीराव कर्डिले राष्ट्रवादी सोडून भाजपा मधे डेरे दाखल झाले आणि राहुरी विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. २०१२ मधे आमदार कर्डिले यांना जिल्हा बंदी असताना नगर तालुक्यातील मविआ मध्ये फूट पडली. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र येत काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि नगर पंचायत समिती सेना- भाजपच्या ताब्यात आली. २०१४-१५ मध्ये अहमदनगर महानगर पालिका नगरसेवक निवडणुकीत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे सुपुत्र शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांचा पराभव झाला. त्या पराभवास आमदार कर्डिले यांना जबाबदार धरून  नगर तालुक्यातील शिवसेनेने भाजपा पासून फारकत घेतली.आणि नगर तालुक्यात २०१६ च्या पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी यांची महविकास आघाडीची पुनर्बांधणी करून लढविण्यात आली.पंचायत समितीच्या १२पैकी ८ जागा जिंकत पंचायत समिती पुन्हा मविआ च्या ताब्यात आली.तर तालुक्यात मविआ ने जिल्हा परिषदेच्या  ६ पैकी ५ जागा जिंकल्या .  १ जागा  राष्ट्रवादी स्वतंत्र माधवराव लामखडे यांनी जिंकली. जिल्हा सहकारी बँक,कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ या निवडणुकीत मात्र तालुका महांविकास आघाडीला यश मिळवता आले नाही.

 आता नगर तालुक्यांतील राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. मविआ चा पाया रचणाऱ्या स्व .माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव आणि नातू आजस्थितीला भाजपावाशी होत आमदार कर्डिले यांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर तालुक्यातील मविआ एकत्रित होती पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडखोरी करून नगर पारनेर मतदार संघात अपक्ष उमेदवारी केली.त्याचा फटका राज्यातील महाविकास आघाडीला बसला आणि अधिकृत उमेदवार राणी लंके यांना पराभव पत्करावा लागला. तसेच मूळ काँग्रेस चे आणि आता राष्ट्रवादी मधे असणारे बाळासाहेब हराळ यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आघाडी धर्म पाळला नाही भावना नगर तालुक्यातील मविआ नेत्यांमध्ये आहे.तर बाळासाहेब हराळ यांनी राष्ट्रवादी उमेदवार राणी लंके यांचा प्रचार करताना अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यावर टीका केली. राणी लंके यांच्या पराभवासाठी संदेश कार्ले यांनी प्रवरेचे टेंडर घेतल्याची जहरी टीका संदेश कार्ले आणि त्यांच्या समर्थकांना चांगलीच झोंबली. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे ,नगर तालुक्यातील स्थानिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते यांनी राहुरी विधानसभा निवडणुकीत बऱ्यापैकी तटस्थ राहणेच पसंत केले.

 स्व .दादा पाटील शेळके यांना नगर तालुक्यातील महा विकास आघाडीचे प्रवर्तक मानले जात होते.त्यांच्या नंतर ती जबाबदारी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी सांभाळली पण आता प्रा.शशिकांत गाडे आजारी असल्याने तालुक्यातील मविआ नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यात संदेश कार्ले यांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील महा विकास आघाडीची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आहे. शिवाजीराव कर्डिले पुन्हा राहुरी विधानसभा मतदार संघात आमदार झाले आहेत तर श्रीगोंदा आणि पारनेर विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत.राज्यात महायुतीचे सरकार आहे.त्यामुळे कर्डिले समर्थक जोषात आहेत.नगर तालुका माविआ मधील अस्वस्थतेचा फायदा घेण्यासाठी आमदार कर्डिले सरसावला  असून नगर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांवर पुन्हा वर्चस्व प्राप्त करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

 - संदेश कार्ले शिवसेना उबाठा ला जय महाराष्ट्र  करण्याच्या तयारीत

नगर तालक्यातील मविआ नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करण्याची तयारी केली आहे.संदेश कार्ले ,माजी सभापती रामदास भोर,उप तालुका प्रमुख प्रकाश कुलट यांनी शुक्रवारी  शिवसेनेचे उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून लवकरच ते शिवसेना उबाठा ला  
जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात  प्रवेश करणार आहेत.आपल्या सोबत नगर तालुक्यातील जास्तीत जास्त शिवसैनिकांना घेण्यासाठी त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post