धुक्यामुळे नगर सोलापूर रोडवर वाळुंज चौकात अपघात

धुक्यामुळे नगर सोलापूर रोडवर वाळुंज चौकात अपघात


नगर संवाद – सोमवारी सकाळी अहिल्या नगर.शहर आणि तालुक्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली होती.अवघ्या 10 फुटांवरीलही दिसत नव्हतं.त्यामुळे
नगर सोलापूर रोडवर वाळूंज चौकात कंटेनर आणि कार आणि टेम्पो यांचा अपघात झाला. पण यामधे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
कंटेनर हा नगर सोलापूर रस्त्यावरील पुला खालच्या रस्त्याने अरणगावाकडे  जात होता.त्याचवेळी नगर कडून सोलापूर महामार्गावर एक कार आणि टेम्पो जात होते.पण धुक्यामुळे चालकांना रस्ता क्रॉस करत असलेला कंटेनर दिसला नाही आणि ही दोन्ही वहाने कंटेनर ला धडकली.त्यामुळे मोठा आवाज झाला.स्थानिकांनी लगेच अपघात स्थळी धाव घेतली.
  प्राथमिक माहितीनुसार काही जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस व बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष म्हस्के राजू हिंगे, शशिकांत झरेकर ,फिरोज पठाण, साईनाथ बनकर आदींनी वाळुंज बायपासवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना तातडीने ॲम्बुलन्स बोलून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. आता नेहमीच धुके पडणार आहे त्यामुळे रस्ता देखभाल करणाऱ्या कंपनीने याबाबत दक्षता घेत.वाहन चालकांसाठी योग्य त्या सिग्नल यंत्रणा राबवावी अशी मागणी माजी उप सभापती संतोष म्हस्के यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post