नगर तालुक्यातील वाळकी आणि चिचोंडी पाटील जिल्हा परिषद गट श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेले आहेत. या भागात शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांची पूर्ण भिस्त नगर तालुक्यातील शिवसैनिकांवर आहे. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे आणि माजी सभापती प्रवीण कोकाटे प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. चिचोंडी पाटील गटातील महा विकासआघाडीतील सर्वच घटक पक्ष एकत्र काम करताना दिसून येत आहेत पण वाळकी जिल्हा परिषद गटात फक्त शिवसैनिकच नागवडे यांच्या प्रचारात दिसत असून इतर मित्र पक्ष दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत.त्यामुळे उमेदवार अनुराधा नागवडे यांची पूर्ण भिस्त नगर तालुक्यातील शिवसैनिकांवर आहे.चिचोंडी पाटील गटात तर जास्तीत जास्त लीड नागवडे यांना मिळवून देण्यासाठी माजी सभापती प्रवीण कोकाटे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत आहेत.
महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ चिचोंडी पाटील येथे प्रचार फेरी काढून कॉर्नर सभा घेण्यात आली.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शशिकांत गाडे, राजेंद्र नागवडे, घनशाम शेलार, बाबासाहेब गुंजाळ, संपतराव म्हस्के, सभापती प्रविण कोकाटे, सरपंच शरद पवार, डॉ मारुती ससे, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, यावेळी डॉ गायत्री फिसके, राजेंद्र भगत, अरुण म्हस्के, संदीप गुंड, उद्धव दुसुंगे शहाजी गोरे, अरुण म्हस्के, पोपटराव निमसे, प्रविण गोरे, माजी सरपंच अंजना पवार, दत्तात्रय हजारे ,महादेव खडके,अर्जुन वाडेकर,पांडुरंग कोकाटे,राजाराम हजारे यांच्यासह चिचोंडी पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद पवार, रामदास झेंडे, अरुण म्हस्के, शहाजी गोरे, पोपटराव निमसे, गणेश बेरड, उद्धव दुसुंगे
यांची भाषणे झाली.
15 वर्षात नगर तालुक्यातील विकासाला खीळ. निकृष्ट कामे, त्यांनी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे द्यावे.
निष्ठावंत कोण
जिल्हा बँकेला कोणाचे मत फुटले, फोटो लावून दिशाभूल...करणाऱ्यांना जनता जागा दाखवणार.
घनश्याम शेलार...नगर तालुक्यातील माणसं स्वाभिमानी, मला लीड दिले. सरकारने थैमान घातले आहे. ते सरकार रोखण्यासाठी मी थांबन्याचा निर्णय घेतला. आघाडी धर्म पाळायचा. शेतकऱ्यांवर अन्याया करणारे सरकार बदलण्याची गरज. राज्यात सरकार माविकास आघाडीचे येणार. थोरात मुख्यमंत्री होणार. गेल्या निवडणुकीत पक्ष तिकीट द्यायला तयार होता. पान दुसऱ्या दिवशी तिकीट घेतले नाही. पक्षाचा विश्वास घात केला. ते कसले निष्ठावंत. कुणी सांगितले म्हणून थांबले, यंदा कोणी सांगितले म्हणून उभे राहिले अगोदर सांगा.असे शेलार म्हणाले.
प्रवीण कोकाटे - हत्याकांड घडलं जबाबदारी कोण घेणार, सरकारचा वचक राहिला नाही, महिला सुरक्षित नाहीत, ते बदलावे लागेल हे आणण्यासाठी संवेदनशील लोकप्रतिनिधी निवडून आणावे लागतील. 1500 रुपये देऊन लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा पिकांना भाव द्या. निवडणूक तोंडावर चुनावी जुमला आहे. सत्ताधाऱ्यांना जाहीरनाम्याची काय आवश्यता. लोकसभेला फटका म्हणून योजना सुरु झाल्या. सुसंस्कृत पणा नागावडे यांच्यात पहाव्यास मिळाला. मोठे मताधिक्याने विधानसभेत पाठवा. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या भागातून मोठे मताधिक्य देवू....
असे कोकाटे म्हणाले.
सरपंच शरद पवार
दिवंगत अंगणवाडी सेविका उमा पवार यांना न्याय मिळावा.त्यांचा प्रश्न विधानसभेत उचला असे आवाहन यावेळी सरपंच शरद पवार यांनी केले.
आबासाहेब कोकाटे
सध्याची निवडणूक विचाराची निवडणूक आहे. आघाडी सरकार आले नाही तर मोठे संकट येणार आहे. नगर तालुक्यात मोठे मताधिक्य देणार.
प्रा.शशिकांत गाडे - 14 ला उद्धव ठाकरे यांची विराट सभा. त्यामुळे पायाखालची वाळू सरकाली.मागील वेळी कुकडी अडचणीत त्यामुळे उभे राहिले नाही असे सांगितलं... आताही कारखाना अडचणीत आहे ,पक्षाने तिकीट नाकारले.. तरी उभे राहिले... कुठे गेली निष्ठा..
अनुराधा नागवडे - आज श्रीगोंद्यात 488 मुली महिला गायब आहेत. उमा पवार ही येथील घटना डोळ्यात अंजन घालणारी घटना. सरकारने घटना गांभीर्याने घेतली पाहिजे. आमदाराणी 10 हजार मदत जाहीर केले. उद्धव दुसुंगे 1 लाख दिले. मतदार संघात अनेक प्रश्न सोडवायचेत. लोकप्रतिनिधी वाम मार्ग करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. दहशत निर्माण करतात त्यांना हद्दपार करा...
Tags
अहिल्या नगर