नगर संवाद
उद्या (दि.२३) निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर राज्यात अनेक संस्थानी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यातील बहुतांश पोल्समधील आकडेवारी नुसार महाराष्ट्रात महायुती बहुमताचा आकडा पार करेल आणि सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे.
पण आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मविआ किती जागा जिंकेल याबाबत स्पष्ट भाष्य केले आहे. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा १२ जागा जास्त म्हणजे 157 जागा महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा पवारांनी केला आहे.
शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एक्झिट पोलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी या एक्झिट पोलचा लोड घेऊ नका, असा सल्ला आपल्या उमेदवारांना दिला. महाविकास आघाडीच्या १५७ जागा येतील असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
जोवर निकाल लागत नाही तोवर मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा आदेशच पवारांनी आपल्या उमेदवारांना दिला आहे. जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबई गाठण्याची व्यवस्था करून ठेवा, असेही पवारांनी म्हटले आहे.