शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेवर बोलण्याचा तनपुरेंना नैतिक अधिकार नाही : शिवाजीराव कर्डिले

शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेवर बोलण्याचा तनपुरेंना नैतिक अधिकार नाही : शिवाजीराव कर्डिले


नगर : अहमदनगर जिल्हा बँक आशिया खंडात अग्रेसर असून शेतकऱ्यांची कामधेनु आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जरुपी भांडवल देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम केले जात आहे. राहुरी सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या आजोबाचे नाव दिले. त्यांनी कारखाना चालवण्यासाठी जिल्हा बँकेकडून कोट्यवधी रुपये कर्ज घेतले. कारखाना सुस्थितीत असताना देखील त्यांना तो चालवता आला नाही. कारखान्याच्या जीवावर आपले राजकारण करून कारखान्याची वाटोळे केले. आधी जिल्हा बँकेचे घेतलेले पैसे भरा. तुम्हाला बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कसलेही आरोप करून आपली निष्क्रियता झाकण्याचे काम करून ते स्वत:चेच हसू करून घेत आहेत. जनता तुम्हाला बरोबर धडा शिकवेल असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, शिराळ, चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, राघू हिवरे, पवळवाडी, खांडगाव, जोहारवाडी आदी गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. ठिकठिकाणी मतदारांनी ढोलताशाच्या गजरात कर्डिले यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी औक्षण करून कर्डिले यांना मोठ्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. गावागावातील युवक या प्रचार दौऱ्यावेळी अतिशय उत्साही असल्याचे पहायला मिळाले. 
या प्रचार दौऱ्यात माजी सभापती संभाजी पालवे, जगन्नाथ गीते, पुरुषोत्तम आठरे, एकनाथ आटकर, राहुल खलाटे, शिवाजी पालवे, अशोक झरेकर, देवेंद्र गीते, मदन पालवे, राहुल अकोलकर, सोपान पालवे, बाबाजी पालवे, लक्ष्मण पोकळे, किशोर पालवे, विठू मुळे, हनुमंत घोरपडे, शरद मुळे, श्रीकांत आटकर ,गणेश महाराज कुदळे, बुब्बूभाई शेख, आसाराम आव्हाड, भानुदास ढमाळे, कर्णा डमाळे, रामनाथ शिरसाठ, जनार्धन गीते, महादेव गीते, उद्धव गीते, दिलीप गीते, बापू गोरे, रशीद शेख, चरणदास आव्हाड आदी उपस्थित होते

कर्डिले म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंधाऱ्यांचा उपयोग व्हावा म्हणून कोल्हार, शिराळ चिचोंडी, डमाळवाडी गीतेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी येथे बंधारे बांधून देण्याचे काम केले. त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले आहे. या भागातील शेतकरी बागायतदार झाले आहेत. राज्यात ऊर्जामंत्री असताना तुम्हाला मतदारसंघातील वीजेचा प्रश्न सोडवता आला  नाही. 

चौकट
कर्डिलेंनी बांधलेल्या सभा मंडपात तुम्हाला सभा घ्याव्या लागतात
शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार दौऱ्यात एकनाथ आटकर यांनी आ.प्राजक्त तनपुरेंवर कडाडून टिका केली. ते म्हणाले,  माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गावोगावी बांधून दिलेल्या सभा मंडपामध्ये तुम्हाला सभा घेण्याची वेळ आली आहे. तुमचे एक तरी काम या परिसरातील गावांमध्ये दाखवा. कोण कामाचा माणूस आहे आणि कोण फक्त लबाड्या करतो हे जनतेला माहित आहे. मतदारसंघांमध्ये कामे न करता जनतेलाच दम देण्याचे काम करता. मी नीट करून टाकेल अशी भाषा बोलता. पण आता तुम्ही कधीच आमदार होणार नाहीत. त्यामुळे जनताच तुम्हाला मतदानातून नीट करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post