नगर संवाद - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन 2026 पहिल्या सेशन साठीच्या परीक्षेत काष्टी येथील टॉपर...
नगर संवाद- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन 2026 पहिल्या सेशन साठीच्या परीक्षेत काष्टी येथील टॉपर्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.या अकॅडमी मधील 22 पैकी 21 विद्यार्थ्यांनी 94 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवले आहेत.
टॉपर्स अकॅडमी ही काष्टी तालुका श्रीगोंदा सारख्या ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातील मुला मुलींना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकते या भावनेने ही संस्था ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. दरवर्षी येथील उत्तम निकालाची परंपरा यावर्षीही सुरू राहिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई मेन 2026 च्या निकालामध्ये शिवम शितोळे (९८.९९), आर्या शेळके (९८.९३), मयूर यादव (९८.९२) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तसेच द्रोन लगड, अनुराधा हराळ, भूमि काळे विद्यार्थ्यांनीही ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाइल तर अभिषेक काशिद, शुभम कळमकर, दीप लगड विद्यार्थ्यांनीही ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाइल व पायल कुरुमकर, सार्थक टकले, भक्ती जाधव, यशराज गरुड, रोहित गव्हाणे, सिद्धेश थोरात, गौरव शेळके, अनुष्का थोरात, राधा रोडे, ओंकार वेताळ, हर्षराज चौधरी, शुभम काळे या विद्यार्थ्यांनीही ९४ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश मिळवले.
२२ पैकी एकूण २१ विद्यार्थ्यांनी ९४ पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवत ग्रामीण भागात टॉपर्स अकॅडमीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.संस्थेचे संचालक प्रा. गणेश कळसकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील एप्रिल सत्रासाठी अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले.
COMMENTS