--> गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा.शशिकांत गाडे | नगर संवाद । nagarsanwad.com
Loading ...

गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा.शशिकांत गाडे

गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  : प्रा.शशिकांत गाडे आजपर्यंत यांना उपजिल्हा प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,सभापती ,उपसभाप...

गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  : प्रा.शशिकांत गाडे
आजपर्यंत यांना उपजिल्हा प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,सभापती ,उपसभापती , पंचायत समिती सदस्य अशी एक ना अनेक पदे दिली.सर्व अधिकार आणि मोकळीक दिली,पण वैयक्तिक स्वार्थ आणि पैसा यांच्यासाठी यांनी गद्दारीं केली. त्यामुळे अशा गद्दारांना घरी बसविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.


नगर तालुक्यातील ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे . या पार्श्वभूमीवर आज यश ग्रँड येथे  ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते. 
  याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव ,माजी सभापती प्रवीण कोकाटे,  गोविंद मोकाटे, पोपट निमसे रा.वी.शिंदे, रवी वाकळे , तालुका प्रमुख राजेंद्र भगत, सरपंच विक्रम गायकवाड, निसार शेख, जीवा लगड, रघुनाथ झिने ,आदिनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
 यावेळी प्रा.गाडे म्हणाले की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाला त्या त्या वेळी शिवसैनिक पेटून उठत असतो.गद्दारीचा राग आजही जनतेत धुमसत आहे.नगर तालुक्यात आजही  तीच स्थिती आहे.या गद्दारांना नगर तालुक्यातील जनता माफ करणार नाही आणि यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.यांना निश्चित पश्चात्ताप होईल पण आता वेळ गेली आहे. गद्दराना माफी नाही,यांचे परतीचे दरवाजे आता बंद झाले आहेत.

नगर तालुक्यातील गेलेल्या गद्दारांना पक्ष सोडायचा होता. त्यांना फक्त कारण हवं होतं. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी पक्ष सोडला आहे. ज्यावेळेस ते मुंबईला पक्षप्रवेशासाठी गेले त्यावेळेस त्यांनी फक्त तीन गाड्या घेऊन गेले. मला वाटलं 70ते 80 गाड्यांचा ताफा असेल काहीच दिसले नाही यावरूनच त्यांची किंमत समजली आहे. संदेश कारले यांना  जिल्हाप्रमुख पदही द्यायची मी तयारी दर्शवली होती. परंतु घरच्यांना विचारतो असे कारण सांगून पुन्हा या विषयाला बगल दिली. पक्षाने आणखीन काय द्यायला हवं होतं दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य एकदा सभापती जिल्हा उपप्रमुख पद असे अनेक पद देऊनही पक्षाशी गद्दारी केली असेल तर येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक यांना जागा दाखवून देतील. मी यांचा पराभव केल्याशिवाय निवृत्ती घेणार नाही असा सणसणीत इशारा गाडे यांनी कारले यांना दिला आहे. आता नव्या जोमाने आता पक्ष बांधायचा आहे. संघटना मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. नगर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आजवर मी जेवढ्या जागा जिंकलो आहे. तेवढ्याच जागा येणाऱ्या निवडणुकीत जिंकून दाखवीन असे प्रा. गाडे यांनी ठणकावून सांगितले. 

चौकट
जिल्हाप्रमुख पदही देत होतो
विधानसभेत पक्षशिस्तीचा भंग करत अपक्ष उमेदवारी केली.तरीही सर्व सोडून देत त्यांना आधार दिला. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यांना मी आजारी आहे त्यामुळे संदेश कार्ले यांना जिल्हा प्रमुख पद द्या अशी शिफारस केली होती. तशी तयारी पक्षप्रमुख यांनीही दाखवली होती.पण वैयक्तिक स्वार्थ आणि पैसा यांच्यासाठी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. 

चौकट

योग्य वेळी जनतेसमोर आणू 

कोणी कोणाच्या सांगण्यावरून विधानसभेला उमेदवारी केली. कोणाला काय काय मिळाले हे आता उघड झाले आहे.योग्य वेळी ते सर्व जनतेसमोर आणले जाईल. गद्दारानी तालुक्यातील शिवसैनिकांना फोन केले, वैयक्तिक गाठी घेतल्या पण शिवसैनिकांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. काही ठिकाणी शिवसैनिकांनी जाब विचारला तर आता वेगवेगळी कारणे सांगत आहेत,पण ते जनतेला पटलेली नाहीत. वैयक्तिक स्वार्थ आणि पैसा हे त्याचे मुख्य कारण आहे.

 


COMMENTS

Name

अहिल्या नगर,116,अहिल्यानगर,25,इतर,15,क्राईम,3,गुन्हेगारी,1,महाराष्ट्र,8,राजकारण,7,सहकार,1,
ltr
item
नगर संवाद । nagarsanwad.com : गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा.शशिकांत गाडे
गद्दारांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा.शशिकांत गाडे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZ0Jz0iOvi-hX2V2MxxzdLwbaPhMPog0u1JWwxFMxY0KMJiBSzenWE_EGvqoy799sfXhcmEc9yu_BEiOs_Z6V41u9yimb3N6BD0dhid7u7hDUHC3jv25tSP63EhpTOFLtHoX2QCsas6lkpbFCoye3fLBMr396bIrC3LqFvT-1qUs_iHw0WqD-hawfF65qT/s320/1743522228906096-0.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZ0Jz0iOvi-hX2V2MxxzdLwbaPhMPog0u1JWwxFMxY0KMJiBSzenWE_EGvqoy799sfXhcmEc9yu_BEiOs_Z6V41u9yimb3N6BD0dhid7u7hDUHC3jv25tSP63EhpTOFLtHoX2QCsas6lkpbFCoye3fLBMr396bIrC3LqFvT-1qUs_iHw0WqD-hawfF65qT/s72-c/1743522228906096-0.jpg
नगर संवाद । nagarsanwad.com
https://www.nagarsanvad.com/2025/04/blog-post.html
https://www.nagarsanvad.com/
https://www.nagarsanvad.com/
https://www.nagarsanvad.com/2025/04/blog-post.html
true
785862819115648553
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content