नगर संवाद नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कालच कामरंगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेन...
नगर संवाद
नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कालच कामरंगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना आज सायंकाळी साडे सहा वाजता खारे कर्जुने येथून घरच्यांच्या समोर बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेले
याबाबत माहिती अशी की खारे कर्जुने येथे शेतामध्ये काही कुटुंबे शेतमजून म्हणून काम करत आहेत. शेतावर वस्ती असल्याने कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडे सहा वाजता थंडी वाढल्याने शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही पाच वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. त्याच वेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि घरच्या लोकांच्या समोर रियांका या मुलीला उचलून घेऊन गेला. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण काही हाती लागले नाही. गावातील लोकांना ही बातमी समजताच लोकांनी मोठी गर्दी वस्तीवर केली. गावातील लोकांनी शोध मोहीम हाती घेतली पण काही हाती लागले नाही. पोलिस स्टेशन आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत शोध सुरु होता.
COMMENTS