नगर संवाद अहिल्या नगर तालुक्यात बिबट्यांची दहशत त मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला असून सध्या रब्ब...
नगर संवाद
अहिल्या नगर तालुक्यात बिबट्यांची दहशत त मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला असून सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांना महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी खडकी, वाळकी ,गुंडेगांव, देऊळगाव, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, बाबुर्डी घुमट ग्रामस्थांनी तालुका महावितरण अधिकारी यांच्याकडे केली आहे.तर दोन दिवसांत व्यवस्था करू असे आश्वासन महावितरण अधिकारी यांनी दिले आहे.
नगर तालुक्यात गावागावात बिबट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. हे बिबटे मानवांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून त्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगांव , देऊळगाव ,सारोळा कासार, घोसपुरी, अकोळनेर, बाबुर्डी बेंद बाबुर्डी घुमट ,खड़की ,हिवरे झरे
परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढला असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरण ने शेती पंपासाठी थ्री फेज वीज पुरवठा रात्री ऐवजी दिवसा करावा यासाठी महावितरणचे अभियंता सपकाळ यांच्याकडे मागणी केली आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष पाटील घिगे , सरपंच भाऊसाहेब बहिरट, सुनिल म्हस्के, संतोष धावड़े नंदू रोकड़े , अनिल कोठुळे , उपसरपंच नवनाथ रोकडे ,नवनाथ कोठूळे ,कैलास कोठुळे, आदी उपस्थित होते. यावेळी दोन दिवसांत योग्य ती व्यवस्था केली जाईल असे आश्वासन तालुका महावितरण चे इंजिनिअर उमाकांत सपकाळ यांनी दिले.
COMMENTS