नगर संवाद- हातवळण येथील बंधारा तातडीने दुरुस्ती करण्यात या मागणी साठी शेतकऱ्यानी लघु पाटबंधारे उपविभाग, सिंचन भवन, कार्यालयात आज...
नगर संवाद- हातवळण येथील बंधारा तातडीने दुरुस्ती करण्यात या मागणी साठी शेतकऱ्यानी
लघु पाटबंधारे उपविभाग, सिंचन भवन, कार्यालयात आज सकाळी ठिय्या आंदोलन केले.बंधारेचे काम उदयाच दि ९ रोजी चालू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
हातवळण ता. नगर जि. अहिल्यानगर येथील कोल्हापुरी बंधारा हा सिना नदी पात्रावरील कोल्हापुरी बंधारा असुन तो बंधारा मागील अतीवृष्टी मध्ये वाहुन गेला. शेतक-यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
या बंधा-याचे काम सुरु झाले नाही तर दिनांक ०८/१२/२०२५ रोजी सकाळी १० : ३० वा. पासून असंख्य शेतक-यांचे जलसंधारण विभागात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असा इशारा शेतकऱ्यानी दिला होता. याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यानी आज सहायक अभियंता श्रेणी-१, लघु पाटबंधारे उपविभाग, सिंचन भवन, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रोड येथे ठिय्या आंदोलन केले
माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे हातवळण येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनर्भरण संदर्भात मौजे हातवळण व ठोंबळ सांगवी येथील ग्रामस्थ हे ठिय्या आंदोलनासाठी उपविभागीय कार्यालयात बसले होते. यावेळी सदर आंदोलनकर्ते यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. सदर चर्चेसाठी मा. कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, अहिल्यानगर, मा. उपकार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग व निम्नस्वाक्षरीकार व उपविभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर चर्चादरम्यान मा. कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग यांनी दिलेल्या सुचनेनुसार दि.०९/१२/२०२५ रोजी सकाळी अंदाजे ११:०० वाजेपर्यंत दहिगाव येथे असलेले पोकलेन मशीन हातवळण येथील को.प. बंधाऱ्यावर दुरुस्तीकामी स्थलांतरीत होईल असे सांगीतले आहे .व तद्नंतर अंदाजे दोन दिवसामध्ये २ टिप्पर उपलब्ध होतील अशी ग्वाही दिली आहे. तरी याद्वारे आपणास कळविण्यात येते कि वरीलप्रमाणे मशिनरी स्थलांतरित झाल्यावर त्वरित पुनर्भरणाचे काम सुरु करण्यात येईल. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब हराळ सह शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS