नगर संवाद - पुणे महामार्गावर कामरगाव( ता-अहिल्यानगर) येथील अत्यंत धोकादायक ठिकाणी संरक्षक कठड्याचे काम पूर्ण झाले असल्याची मा...
नगर संवाद - पुणे महामार्गावर कामरगाव( ता-अहिल्यानगर) येथील अत्यंत धोकादायक ठिकाणी संरक्षक कठड्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी दिली
कामरगाव येथील वालुंबा नदीच्या उत्तरेला सुमारे 200 मीटर अंतरावर ठोकळ वस्ती आहे तेथे रस्त्याला तीव्र गोलाकार उतार असून पुण्याकडे जाताना चालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट 50 फूट खोल. खड्ड्यात पडते त्यामुळे तेथे जीवित हानी होण्याची दाट शक्यता होती.यापूर्वी या ठिकाणी चाळीसहून अधिक वाहने खाली खड्ड्यात पडली होती. त्यामुळे वाहनांची लाखो रुपयांची नुकसान झाली होती त्यामुळे तेथे भविष्यात निष्पाप जीवांचा बळी जाऊ नये याबाबतचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचे सह किशोर ठोकळ, सुयोग ठोकळ, छगन वेताळ, अंबादास रोहोकले, रविराज साठे, गोरख भोसले यांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची देखभाल करणाऱ्या चेतक एंटरप्राईजेस कंपनीचे कार्यकारी अधिकारी व टोल मॅनेजर शंकर खोसे,अभियंता सनीद भडके व प्रोजेक्ट मॅनेजर पप्पू अंजना यांना दिले होते.
त्या निवेदनाची कंपनीने दखल घेऊन सुमारे 18 लाख रुपये खर्च करून मजबूत संरक्षक कठड्याचे काम पूर्ण केले.
यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांचा जीव भांड्यात पडला आहे. आता त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता संपली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले तत्परता व केलेले मजबूत काम पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे,जगदीश शेळके, विलास झरेकर, बबनराव भुजबळ, यश ठोकळ, अंकुश खोडदे, किसन ठोकळ, रोहन ठोकळ, प्रदीप ढवळे, यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले व कंपनीचे सुपरवायझर ज्ञानदेव साठे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
..............................................
ठोकळ वस्ती समोर महामार्गावर तीव्र गोलाकार वळण असल्याने वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहने विरुद्ध दिशेला पडत होती आता त्या ठिकाणी संभाव्य धोका टळला असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून केलेले काम स्तुत्य व अभिनंदनस्पद आहे
तुकाराम कातोरे सामाजिक कार्यकर्ते कामरगाव
COMMENTS