नगर संवाद मदडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक...
नगर संवाद
मदडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
सभेच्या अध्यक्षस्थानी मदडगाव सेवा संस्थेचे ज्येष्ठ सभासद सदाशिव गायवळ होते.
मदडगाव सेवा संस्थेला 31 मार्च 2025 अखेर 4 लाख 70 हजार रुपये नफा झाला . संस्था चालू वर्षी सभासदांना 12 टक्के दराने लाभांश वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बबन शंकर शेडाळे यांनी दिली.
मदडगावचे सरपंच साहेबराव शेडाळे यांनी प्रास्ताविकात म्हणाले कि चालू वर्षी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . सरकार ने फक्त थकबाकीदारना कर्ज माफी न करता सरसकट सर्व सभासदांना सारखीच कर्जमाफी करावी असा ठराव सरपंच साहेबराव शेडाळे यांनी मांडला . त्यास सर्व सभासदांनी एकमताने मंजूर दिली. असे झाल्यास सहकारी संस्था टिकण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभेमध्ये संस्थेचे दिवंगत संचालक कै मुक्ताराम ढवळे व कै बाबासाहेब कांबळे तसेच इतर मयत सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सभेस संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपराव काळे, संचालक विलासराव शेडाळे, मुरलीधर गायवळ, नितीन सुंबे, गोवर्धन शेडाळे, मच्छिंद्र शेडाळे ,सोपान शेडाळे, तसेच आदिनाथ गायवळ, शहाजी शेडाळे ,शरद शेडाळे, रंगनाथ आठरे , प्रमोद काळे , श्रीकृष्ण शेडाळे , माजी चेअरमन गोरख शेडाळे, नरहरी शेडाळे ,आसाराम सुंबे, दत्तू काळे ,बिबीशन शेडाळे ,बबन पगडे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिव अतुल भोसले यांनी संस्थेची आर्थिक पत्रकांची माहिती व इतिवृत्ताचे वाचन केले.
संस्थेचे संचालक विलासराव शेडाळे यांनी आभार मानले
COMMENTS