नगर संवाद - सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी निंबळक बायपास चौकात मागील दोन ते अडीच महिन्यापासून फुटल्यामुळे दररोज लाखो...
नगर संवाद- सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी निंबळक बायपास चौकात मागील दोन ते अडीच महिन्यापासून फुटल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे . या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले असून डांबरी रस्ता खचला आहे. तसेच उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या भेगा पडल्या आहेत. दररोज किरकोळ अपघात घडत आहे. मोठी दुर्घटना घडू शकते. तरी संबंधित पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी असे अन्यथा पाणीपुरवठा खंडित केला जाईल असा इशारा माजी पंचायत समिती असभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी दिला आहे.
निंबळक बायपास चौकातून सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली आहे.ही जलवाहिनी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून लिकेज असून या लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे व हे पाणी सर्व पाणी निंबळक बायपास चौकात साचत आहे. यामुळे या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दररोज अपघात घडत आहेत. व या पाण्यामुळे रस्त्याची नुकसान होऊन या ठिकाणी खड्डे पडले आहेत व या येथे असणाऱ्या उड्डाणपुलाच्या पिलरलाही भेगा पडलेल्या आहेत. अडीच महिन्यापासून पाणीपुरवठा विभाग लिकेज कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. डॉक्टर दिलीप पवार यांनी यासंदर्भात केडगाव, आरंणगाव, सुपा एमआयडीसीतील अधिकाऱ्याशी संपर्क केला होता व ही पाणी योजना आपली नाही असे सांगीतले.या संदर्भात एम आय डी सी अधिकाऱ्यानी उडवाउडवी उत्तर दिले असल्याचे डॉक्टर पवार यांनी सांगितले. संबंधित एमआयडीसी विभागाचे मुख्य अधिकारी श्री एस एन आनुसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर जलवाहिनी ही सुपा एमआयडीसीची असल्याचे सांगितले. तरी सुपा एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा येथील पाणीपुरवठा बंद केला जाईल असा इशाराही डॉ. दिलीप पवार यांनी यावेळी दिला
शनिवारी काम पूर्ण करणार असल्याचे आनुसे यांनी सांगितले
COMMENTS