नगर संवाद नगर दिनांक 15 जागोजागी वाकलेले पोल... त्यावर लोम कळल्या तारा... शेतात मशागत करताना विजेच्या झटक्याची भीती... त्यातून...
नगर संवाद
नगर दिनांक 15 जागोजागी वाकलेले पोल... त्यावर लोम कळल्या तारा... शेतात मशागत करताना विजेच्या झटक्याची भीती... त्यातून संभाव्य होणारी जीवित हानी
हे दृश्य आहे अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील शेत शिवारातील विजेचे पोल व त्यावर लोमकळलेल्या असलेल्या तारांची
गावात सुमारे 56 वर्षापूर्वी वीज आली त्यावेळी उभे केलेले पोल व तारा यांची दूरवस्था झाली आहे काही ठिकाणी दोन पोल मधले अंतर जास्त आहे तर काही ठिकाणी पोलला लावलेले ताण निसटले आहेत त्यामुळे जागोजागी पोल वाकले असून त्यावरील तारा लोमकळत आहेत तारा शेजारी उभे राहून हात वर केले असता तारा खाली व हात वर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याला शेतात मशागत करताना जीव मुठीत धरून काम करावे लागते विशेषता पावसाळ्यात तारा जिर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी त्या वारा पावसामुळे तुटून जमिनीवर पडतात त्यामुळे जीवितहानीचे प्रकार घडतात गेल्या आठवड्यात तुटलेल्या तारांमुळे अनिल रामभाऊ राजगुरू या गरीब शेतकऱ्याच्या बैल जोडीला विजेचा तीव्र झटका बसून तो जागीच मरण पावला व दुसऱ्या बैलाला इजा झाली त्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे भविष्यकाळात गावात मनुष्य व प्राण्यांची जीवित हानी होऊ नये म्हणून गावातील जागरूक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी गाव शिवाराची चौफेर पाहानी केली त्यावेळी त्यांना धोकादायक ठिकाणी लक्षात आली
आज महावितरणचे केडगाव ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता वैभव निकम यांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्यासह रविराज साठे प्रकाश कातोरे अशोक घुले संतोष भुजबळ बाळासाहेब ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने लेखी निवेदन दिले व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निकम यांच्याशी सविस्तर उपाययोजनांची चर्चा केली त्यांनी लगेचच संबंधित ठेकेदारांना सूचना करून काम तत्काळ पूर्ण करण्याबाबत आदेशित केले तसेच वायरमन यशवंत पाठक व योगेश दळवी यांना बाबत सर्वे करण्याबाबत सांगितले
निकम यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले
..............................................
राज्य शासनाचा महावितरण विभाग शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे गावात विजेच्या बाबत दाखवलेल्या त्रुटी योग्य असून त्या सोडवण्याबाबत महावितरण कटिबद्ध आहे
वैभव निकम सहाय्यक अभियंता केडगाव ग्रामीण
COMMENTS