नगर संवाद: टाकळी काझी वि का सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेच्या वातावरणात पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी स...
नगर संवाद:टाकळी काझी वि का सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेच्या वातावरणात पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ सभासद वसंतराव मस्के हे होते
संस्थेला 31 मार्च 2025 अखेर 12 लाख 43 हजार रुपये नफा झाला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन संपतराव बंशीभाऊ मस्के यांनी दिली. तसेच संस्था चालू वर्षी सभासदांना 15 टक्के दराने लाभांश वाटप करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. टाकळी काझी सेवा संस्था ही नगर तालुक्यातील पहिली ऑनलाईन संस्था झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक बनशी भाऊ म्हस्के विद्यालयाचे मुख्याध्यापक कुमार मस्के सर यांनी केले
सभेस संस्थेचे व्हाईस चेअरमन गोविंदराव गावडे, संचालक आसाराम म्हस्के, शशिकांत गावडे, रतिलाल मस्के, चंद्रभान नारळे, सतीश आटोळे ,कचरू ढगे, बाबासाहेब ढगे ,संपत शिंदे, बाळासाहेब म्हस्के, तसेच टाकळी काझी गावच्या माजी सरपंच सुनीताताई ढगे, माजी सरपंच आसाराम मोटे, अरुण म्हस्के, साहेबराव गावडे, रावसाहेब गावडे, सुदाम गावडे, शरदराव ढगे, राजू आटोळे, माजी सरपंच भाऊसाहेब आटोळे, विलास ढगे, एकनाथ ढगे, विलास गावडे, लक्ष्मण कांबळे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
बन्सी भाऊ मस्के विद्यालयाचे शिक्षक हरिश्चंद्र ढगे यांनी आभार मानले.
COMMENTS