नगर संवाद चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा लिलाई मंगल कार्यालय येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेच्...
नगर संवाद
चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा लिलाई मंगल कार्यालय येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन श्री.डॉ.ययाती फिसके होते.
*प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे चेअरमन संदीप कोकाटे यांनी केले. बोलताना त्यांनी सांगितले की शासनाच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणेमुळे अनेक सभासदांनी आपला कर्ज भरणा केला नाही त्यामुळे मार्च अखेर संस्थेचा तोटा दिसत आहे परंतु बँकेने व्याजाची सवलत जुन अखेरपर्यंत दिल्यामुळे सर्व संचालकाच्या प्रयत्नातून मार्च अखेरचा तोटा भरून काढून संस्था नफ्यात आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत*
सरसकट कर्जमाफी, नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रुपये पन्नास हजाराच्या अनुदान त्वरित मिळावे,यावर्षी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे विहिरी गाळाने भरणे,जमीन खरडून जाणे,फळझाडे वाहून जाणे , पूर्ण पीक पाण्यात बुडणे यासारख्या नुकसानीसाठी नेहमीचे निकष डावलून प्रती हेक्टरी किमान रुपये पन्नास हजार आर्थिक मदत देण्यात यावी असे ठराव घेण्यात ठराव घेण्यात आले.
*अत्यंत पारदर्शकपणे व काटकसरीने संस्थेचा कारभार केल्याबद्दल व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या बद्दल सर्व संचालक मंडळाचे कौतुक सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी केले*,
साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.
पिक विमा बद्दल माहिती देताना ज्येष्ठ शिक्षक नेते व मा.चेअरमन आबासाहेब कोकाटे सर यांनी सांगितले की यावर्षी पिक विम्याचे निकष बदलल्यामुळे केवळ पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आले तरच आपल्याला विमा मिळणार आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडालेली आहेत त्यामुळे अत्यंत कमी उत्पन्न येणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरला त्यांना चांगला मोबदला मिळेल अशी शक्यता वर्तवली.
सभेसाठी मा.चेअरमन महादेव खडके,मा.सरपंच मच्छिन्द्र खडके, मा.पं.स.सदस्य सुधीर भद्रे,मा. सरपंच दिलीप पवार,डॉ.मारुती ससे,बाजीराव हजारें,पांडुरंग ससे,राजूशेठ हजारे,अमोल कोकाटे,मा.चेअरमन राजेंद्र कोकाटे,विठ्ठल कोकाटे,अशोक कोकाटे,अरुण दवणे,व्हा.चेअरमन काशिनाथ वाडेकर,अर्जुन वाडेकर,सुरेश ठोंबरे,पंडित कोकाटे,महेश जगताप,अंबादास फिसके,बबन कोकाटे,चंद्रकांत सदाफुले,कासमशेठ सय्यद यांसह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.
अहवाल वाचन सचिव श्री दत्तात्रय झांबरे यांनी केले व आभार संस्थेचे माजी व्हा.चेअरमन डॉ.मारुती ससे यांनी मानले.
COMMENTS