नगर संवाद - गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे मोठे नु...
नगर संवाद- गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नारायणडोहो (ता. नगर) परिसरालाही मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पाहणी केली. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच शंकरराव साठे, बाळकृष्ण साठे, बबन साठे, रवींद्र साठे, पोपट साठे, शब्बीर शेख, बाबासाहेब वाबळे , मोहन चौधरी, केशव वाबळे , सुनील साठे, गोवर्धन शिरसाठ आदी उपस्थित होते.
आ.पाचपुते यांनी नारायणडोहो येथील पुरग्रस्त पाचमान वस्ती व तेरामण वस्तीला भेट दिली तसेच रवींद्र वाबळे, भाऊसाहेब गर्जे, गोरख बांगर यांच्या घराजवळील नदीवरील पुलाच्या कामासाठी अधिकार्यांना सूचना दिल्या. एनडीआरएफमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बाळकृष्ण साठे व सुनील साठे, पोपट साठे व गोवर्धन शिरसाठ यांच्या घराजवळील नदीवरील पुलासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. पारगाव फाटा रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आ. पाचपुते यांनी दिले आहे.
COMMENTS