नगर संवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव भातोडी शालेय व्यवस्थापन समिती व शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय...
नगर संवाद
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव भातोडी शालेय व्यवस्थापन समिती व शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय शांततेत व खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. शालेय समिती अध्यक्ष पदी श्री. प्रशांत बाबासाहेब शिंदे ,उपाध्यक्ष पदी श्री. ईश्वर विठ्ठल शिंदे तसेच समिती सदस्य पदी कविता महेश गुंड ,अतुल रामदास शिंदे ,शुभांगी दत्तात्रय गुंड,मनिषा गोरख जाधव ,छाया गणेश उमाप,सौ.सुवर्णा शिंदे यांची निवड झाली. यावेळी श्री शाळेचे मुख्याध्यापक श्री ढोकळे सर, श्री महांडुळे सर सौ.सविता सचिन शिंदे,श्री विक्रम शिंदे, श्री निलेश शिंदे, श्री अजित शिंदे श्री विशाल शिंदे, श्री सचिन उमाप श्री. अमोल शिंदे, श्री. असिफ शेख, श्री सागर चंद्रकांत शिंदे,श्री सचिन पंढरीनाथ शिंदे व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व शालेय समिती सदस्यांचे अभिनंदन युवा व्याख्याते, तथा महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे संचालक श्री गणेश शिंदे, पारगाव भातोडी च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. मीनाक्षी संतोष शिंदे, माजी उपसरपंच श्री सुरेश भोसले,शालेय शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा सौ.श्वेता रमेश गुंड,पारगाव भातोडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री साहेबराव गुंड , व्हा.चेअरमन श्री मधुकर शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. संजय जगताप,ग्रा.सदस्य छोटु भाई शेख, माजी उपसरपंच दत्तात्रेय तनपुरे,माजी चेअरमन श्री अशोक लक्ष्मण शिंदे,माजी चेअरमन गोविंद गुंड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS