नगर संवाद - नगर तालुक्यात तसेच गुंडेगाव परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासन पंचनामे करण्यासाठी...
नगर संवाद- नगर तालुक्यात तसेच गुंडेगाव परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासन पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर देखील दाखल झाले आहे. पंचनामे करण्यासाठीही देखील पावसाने उघडीप दिली नाही.गुंडेगाव परिसरात डोंगराळ व उताराचा जास्त भाग असल्याने झालेल्या पावसाचे पाणी लगेच नदी नाल्यांना येते. शुढळा , बांगरी , वालुंबा या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या नद्यांच्या काठची रुईछत्तीशी , गुणवडी , वाळकी , वडगाव तसेच मठपिंप्री , हातवळण या गावातील नदी कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांनी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर सुरक्षित ठिकाणी जावून आपली काळजी घ्यावी असे आवाहन तालुका महसूल व ग्रामविकास प्रशासनाने केले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे प्रशासनाला आवाहन केले.ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान पाहून मदत मिळावी यासाठी तालुका प्रशासनास बाळासाहेब हराळ यांनी धारेवर धरले. गुंडेगाव परिसरातून अजून पावसाच्या पाण्याचा जोर चालू असल्याने अजून पाणी वाढण्याची शक्यता त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केले आहे...(पत्रकार देविदास गोरे)
COMMENTS