श्रीगोंदा मतदारसंघात विक्रम पाचपुते यांच्या विजयासाठी नागरिकांनी बांधली 'वज्रमूठ'

श्रीगोंदा मतदारसंघात विक्रम पाचपुते यांच्या विजयासाठी नागरिकांनी बांधली 'वज्रमूठ'

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मतदारसंघातील नोकरदार वकील, डॉक्टर, व्यापारी, कामगार  यांच्यासह विविध महिला बचत गट, तसेच राजकीय, सामाजिक संघटना आणि गावोगावच्या शेकडो सार्वजनिक तरुण मंडळांचा जाहीर पाठींबा त्यांना मिळताना दिसत आहे.
* दिवसेंदिवस पाठींबा देणाऱ्या समाजघटकांची संख्या वाढत असून विक्रम पाचपुते यांना किमान एक लाखांहून अधिक मतांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प या सर्वांनी केला आहे.
* मा पाचपुते साहेब यांनी कायम विकासाचे राजकारण केले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांनी मतरुपी जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी झटले पाहिजे ही साहेबांची  कार्य पद्धती आहे. त्यांची हीच कार्यपद्धती आचरणात आणून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जे महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी विक्रम दादांनाच मत देण्याचे आवाहन समाजघटकांकडून केले जात आहे.
* पाचपुते साहेबांनी केलेल्या कामांचा आदर्श वसा घेतलेले विक्रम दादा हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासदेखील मतदार व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post