नगर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण अहिल्या नगर तालुक्यातील प्रारूप जिल्हा परिषद गट आणि गण रचना जाही...
नगर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण
अहिल्या नगर तालुक्यातील प्रारूप जिल्हा परिषद गट आणि गण रचना जाहीर झाली आहे.नवनागापूर जिल्हा परिषद गटात (देहरे व नवनागापूर पंचायत समिती गण),जेऊर गटात (जेऊर व बुऱ्हाणनगर),नागरदेवळे गट ( नागरदेवळे व केकती)
दरेवाडी (दरेवाडी व चिचोंडी पाटील ),निंबळक (निंबळक व चास ),वाळकी (वाळकी व गुंडेगाव) अशा ६ गटांचा तर १२ पंचायत समिती गणांचा समावेश आहे.
नवनागापूर जिल्हा परिषद गटामधील देहरे गणामध्ये (देहरे ,नांदगाव शिंगवे , विळद, खारे कर्जुने इसळक निमगाव गाना पिंपरी घुमट)
नवनागापूर गणात( नवनागापूर, वडगाव गुप्ता पिंपळगाव माळवी, मांजर सुंबा) या गावांचा समावेश आहे.
जेऊर जिल्हा परिषद गटांमध्ये जेऊर गणातील( जेऊर, धनगरवाडी ,डोंगरगण ,इमामपूर, शेंडी, मजले चिंचोली ,खोसपुरी पांगरमल ,उदरमल, आव्हाडवाडी) बुऱ्हाणनगर गणात ( बुऱ्हाणनगर, बहिरवाडी, ससेवाडी ,पोखर्डी, पिंपळगाव उज्जैन, वारूळवाडी, कापूरवाडी, देवगाव ,रतडगाव यांचा समावेश आहे.
नागरदेवळे जिल्हा परिषद गटांमध्ये नागरदेवळे पंचायत समिती गण मधील नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी ही गावे तर केकती गण मधील केकती, शहापूर ,मेहेकरी बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी पिला,खांडके, रांजणी, माथनी ,भातोडी पारगाव, पारेवाडी , कौडगाव, कोल्हेवाडी , सारोळाबद्धि ,आगडगाव यांचा समावेश आहे.
दरेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये दरेवाडी पंचायत समिती गणातील दरेवाडी , बुरुडगाव ,वाकोडी, अरणगाव ,खंडाळा ही गावे तर चिचोंडी पाटील गणातील चिचोंडी पाटील, आठवड ,सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायण डोहो, निंबोडी ,वाळुंज, टाकळी काझी, मदडगाव ,दशमी गव्हाण या गावांचा समावेश आहे.
निंबळक जिल्हा परिषद गटामध्ये निंबळक पंचायत समिती गणातील निंबळक हमीदपुर , नेप्ती, जखनगाव ,हिंगणगाव खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा यांचा समावेश आहे तर चास गणातील चास, भोयरे खुर्द, पिंपळगाव कौडा ,कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर सोनेवाडी, निमगाव वाघा यांचा समावेश आहे.
वाळकी जिल्हा परिषद गटामध्ये वाळकी पंचायत समिती गणतील वाळकी, बाबुर्डी घुमट, खडकी, सारोळा कासार ,बाबुर्डी बेंद, घोसपूरी , हिवरेझरे ,देऊळगाव सिद्धी ,तांदळी वडगाव यांचा समावेश आहे .तर गुंडेगाव पंचायत समिती गणातील गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी ,दहिगाव ,पारगाव मौला ,शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ ,रुईछत्तीशी, गुणवडी, आंबिलवाडी, मठ पिंपरी, हातवळण यांचा समावेश आहे. या प्रारूप रचनेवर 21 जुलै पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
COMMENTS